🛑 नीट २०२० परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती विद्यार्थ्यांना लवकर कळणार 🛑

0
31

🛑 नीट २०२० परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती विद्यार्थ्यांना लवकर कळणार 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 22 ऑगस्ट : ⭕ वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (MBBS / BDS) होणारी नीट (NEET) प्रवेश परीक्षेसंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने आपले अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in वर हे परिपत्रक जारी केले आहे.

नीट २०२० च्या परीक्षा केंद्रांच्या बाबतीत महत्त्वाची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. एटीए पहिल्यांदाच नीटच्या विद्यार्थ्यांना ही सुविधा देत आहे. दरवेळी परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल, याची माहिती अॅडमिट कार्ड म्हणजेच प्रवेश पत्रात दिली जाते. पण यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ही माहिती आधी मिळत आहे.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, सध्यस्थितीत अॅडमिट कार्ड मिळायच्या आधीच एनटीए आणि नीटच्या अधिकृत संकेतस्थळांवर परीक्षार्थींना त्यांच्या परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती दिली जात आहे, जेणेकरून आयत्या वेळी त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची कसरत करावी लागू नये. जर परीक्षा केंद्राचे शहर त्यांच्या वर्तमान शहरापेक्षा वेगळं असेल तर तेथे पोहोचण्याची तयारी त्यांना करता येईल.

आपल्या परीक्षा केंद्राच्या शहराचे नाव या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या लिंकवरून तपासता येईल.

➡️ अॅडमिट कार्डची माहिती :-

या परिपत्रकात एनटीएने हेही सांगितले आहे की नीट २०२० साठी लवकरच अॅडमिट कार्ड जारी केले जातील. अॅडमिट कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि पत्ता, प्रश्नपत्रिकेचे माध्यम (भाषा), रिपोर्टिंग आणि एंट्री टाइम, परीक्षा केंद्राचे गेट बंद होण्याची वेळ आदी माहितीचा समावेश असेल.

एनटीएद्वारे नीट २०२० चे आयोजन १३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळा ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

➡️ हेल्पलाइन क्रमांक :-

ईमेल आयडी – neet@nta.ac.in

संपर्क क्रमांक –

८२८७४७१८५२,

८१७८३५९८४५,

९६५०१७३६६८,

९५९९६७६९५३,

८८८२३५६८०३. ⭕

Previous article🛑 ”या” आहेत गणपती विसर्जनादरम्यानच्या सूचना 🛑
Next article🛑 मस्जिद बंदर भागातील…..! इमारतीला लागलेल्या आगीत नियंत्रण….! जीवितहानी नाही 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here