*कोल्हापूरचे नवनिर्वाचित आमदारांना कोरोनाची लागण*

0
27

*कोल्हापूरचे नवनिर्वाचित आमदारांना कोरोनाची लागण*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्यातील नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याची माहिती स्वत: ऋतुराज यांनी ट्विट करत दिली आहे. ऋतुराज यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून कोल्हापूरातील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. “माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये.
पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती,” असे ऋतुराज पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
कोरोना संकटात विविध कामानिमित्त ऋतुराज विविध मतदारसंघात फिरत होते. त्यामुळे कामाच्या दरम्यान संपर्कात आलेल्या लोकांद्वारे कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. ऋतुराज पाटील हे तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. कोरोना संकटात त्यांनी शेअर केलेला ‘त्याला_काय_हुतंय ??’ हा व्हिडिओ हिट झाला. या व्हिडिओतून त्यांनी ‘आता आपण प्रत्येकजण कोरोना योद्धा होऊया,’ असं आवाहन कोल्हापूरकरांना केलं होतं.

Previous articleगगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस*
Next article*इचलकरंजी आगारात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here