🛑 “कोरोना “ला नष्ट करतो ‘कडुनिंब’.. ? भारतात होतय मानवी परीक्षण 🛑

0
33

 

🛑 “कोरोना “ला नष्ट करतो ‘कडुनिंब’.. ? भारतात होतय मानवी परीक्षण 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ – कोरोनावर लस शोधण्यासाठी अनेक डॉक्टरांची टीम दिवसरात्र प्रयत्न करत आहे. यामध्ये आयुर्वेद देखील अनेक प्रयोग करत आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ आयुर्वेदने निसर्ग हब्स नावाच्या कंपनीसोबत करार केला आहे. या दोन्ही संस्था कडुनिंब कोरोनावर कितपत फायदेशीर ठरेल याचे परीक्षण करणार आहेत. हे परीक्षण फरिदाबाद च्या ESIC हॉस्पिटलमध्ये केले जाणार आहे.

AIIA च्या डॉ तनुजा नेसारी या परीक्षणाच्या प्रमुख असतील. त्यांच्या सोबत ESIC हॉस्पिटलच्या डॉ असीम सेन असणार आहेत. या टीम मध्ये AIIA आणि ESIC चे आणखी 6 डॉक्टर असणार आहेत.

250 लोकांवर होणार चाचणी

ही टीम कडुनिंब कोरोनावर किती फायदेशीर ठरू शकतं, याचे परीक्षण 250 लोकांवर चाचणी करुन ठरवणार आहे.

या रिसर्च मधून कडूनिंबाच्या कॅप्सूल कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे कशा प्रकारे संरक्षण करू शकते याचेही परीक्षण करण्यात येणार आहे.

2 महिन्यांपेक्षा जास्त चालेल ही प्रक्रिया

यासाठी ज्या लोकांवर या कॅप्सूलचे परीक्षण केले जाणार आहे त्यांचा शोध सुरु झाला आहे. यामध्ये 125 लोकांना कडुनिंब कॅप्सूल दिले जाईल आणि सोबतच 125 लोकांना खाली कॅप्सूल दिले जाईल. ही प्रक्रिया 28 दिवस सुरु राहणार आहे आणि याच्या परिणामाचे निरीक्षण केले जाणार आहे…⭕

Previous article🛑 मनसेच्या निशाण्यावर पुन्हा शिवसेना….! महापौरांवर केले गंभीर आरोप 🛑
Next article🛑 बदल्यांचा घोळ संपेना…..!पोलिसांच्या बदल्यांना सात सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here