🛑 विद्यार्थ्यांना भरावा लागेल डिक्लेरेशन फॉर्म; कशी होणार परीक्षा जाणून घ्या 🛑

0
21

🛑 विद्यार्थ्यांना भरावा लागेल डिक्लेरेशन फॉर्म; कशी होणार परीक्षा जाणून घ्या 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 21 ऑगस्ट : ⭕ करोना विषाणू महामारीच्या काळातच काही दिवसांनी देशातली यंदाची पहिली राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा होणार आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे १ सप्टेंबर पासून जेईई मेन परीक्षेचे आयोजन होणार आहे.

देशभरात विविध शहरांमधील विविध केंद्रांवर ही परीक्षा ६ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. देशविदेशातील लाखो उमेदवार या परीक्षेत सहभागी होतील. आता प्रश्न हा आहे की करोना संसर्ग काळात ही परीक्षा नेमकी कशी घेतली जाणार? जर कोणी विद्यार्थी करोना संक्रमित असेल तर तो परीक्षा देऊ शकणार का? एनटीएने विद्यार्थी-पालकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत…

➡️ किती केंद्र?

एनटीए द्वारे JEE Main 2020 चे आयोजन संगणक आधारित पद्धतीने होईल. बीटेक / बीई आणि बीआर्क साधी दोन वेगवेगळ्या परीक्षा होतील. बीटेक / बीई साठी देशभरात ६०५ परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत. बीआर्कसाठी देशातील विविध शहरांमध्ये ४८९ परीक्षा केंद्रं आहेत. भारतात एकूण २२४ शहरांमध्ये आणि परदेशातील आठ शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

➡️ कशी घेतली जाणार परीक्षा?

एनटीएमधील जेईई मेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सर्व परीक्षा केंद्रांच्या गेटवर प्रत्येक विद्यार्थ्याला एक सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरावा लागेल. यात आरोग्य सेतु अॅपमध्ये त्यांनी जी माहिती भरली असेल, ती भरायची आहे.’

‘विद्यार्थ्यांना विचारले जाईल की त्यांना ताप, कोरडा खोकल्यासारखी कोणती लक्षणे आहेत वा नाही? गेल्या काही दिवसात ते कुठल्या करोनासंक्रमित रुग्णाच्या संपर्कात आले आहेत का? जर कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरातून तो विद्यार्थी संक्रमित असण्याची शक्यता असेल तरी त्याला परीक्षा देण्यापासून रोखण्यात येणार नाही,’ असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रांवर आयसोलेशन रुम बनवण्यात आले आहेत. करोना संक्रमित किंवा असिम्टमॅटिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवरील आयसोलेशन रुममध्ये बसून परीक्षा द्यावी लागेल.

➡️ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणखी काय उपाययोजना?

एनटीए अधिकाऱ्याने सांगितले की ‘जेईई मेन परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना थ्री-प्लाय मास्क दिले जातील, जे त्यांनी परीक्षा केंद्रात पोहोचल्यापासून बाहेल जाईपर्यंत घालणे अनिवार्य असेल. सर्व परीक्षा केंद्रे, संगणक, टेबल-खुर्च्या सॅनिटाइज केल्या जातील. परीक्षेदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन केले जाईल.’

परीक्षा सुरू होण्याआधी ही सर्व व्यवस्था करावयाची असल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रिपोर्टिंग वेळा देण्यात येणार आहेत, जेणेकरून एकावेळी एका ठिकाणी गर्दी होणार नाही.⭕

Previous article🛑 शेअर बाजार ; निर्देशांकातील तेजीला ब्रेक अन् नफेखोरी जोरात 🛑
Next article🛑 मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची….! महत्त्व पूर्ण बैठक संपन्न 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here