परराज्यात जाणारे कांदा बियाणे तातडीने थांबवा; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

0
29

परराज्यात जाणारे कांदा बियाणे तातडीने थांबवा; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

प्रतिनिधी =किरण अहिरराव युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र 

नाशिक : कंपन्यांना राज्याबाहेर कांदा बियाणे विक्रीसाठी संपूर्ण बंदी घालावी. तसेच कंपन्यांनी कांदा बियाणे चढ्या दराने विक्री न करता माफक दरात उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी कृषी विभागाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली.

लाल आणि उन्हाळ कांद्याच्या बियाण्याचा तुटवडा

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे आणि नंतर खराब हवामानामुळे खरीप व रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या कांदा बियाण्याचा उतारा कमी मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादकांना लाल आणि उन्हाळ कांद्याच्या बियाण्याचा तुटवडा भासत आहे. म्हणूनच राज्यामध्ये उत्पादित झालेले खासगी कंपन्यांचे बियाणे प्राधान्यक्रमाने राज्यातील शेतकऱ्यांना विकले जावे.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे व प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी याबाबतचे पत्र दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here