*धोनी पाठोपाठ अवघ्या ४० मिनिटात सुरेश रैनाने पण केले आंतरराष्ट्रीय क्रिकेट ला बाय बाय:

0
25

*धोनी पाठोपाठ अवघ्या ४० मिनिटात सुरेश रैनाने पण केले आंतरराष्ट्रीय क्रिकेट ला बाय बाय:*✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने निवृत्तीची घोषणा करुन ४० मिनीटंही झाली नाही तोच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच दोन क्रिकेटरने एकाच दिवशी ४० मिनीटांच्या गॅपने निवृत्तीची घोषणा केली असावी.
” माही, तुझ्यासोबत खेळने हा एक चांगला प्रवास होता. अतिशय़ अभिमानाने मी तुझ्यासोबत माझ्याही निवृत्तीची घोषणा करत आहे, ” अशी पोस्ट रैनाने केली आहे.
सुरेश रैना भारताकडून १८ कसोटी, २२६ वनडे व ७८ टी२० सामने खेळला असून २०११ विश्वविजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता. रैनाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १७ जुलै २०१८ रोजी इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळला असून तो भारतीय संघात कमबॅकसाठी प्रयत्न करत होता.

Previous article**माहीचा (MSD) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय*
Next article*चीनच्या पहिल्या कोरोना लशीला* *मिळाला पेटंट*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here