🛑 Independence Day 2020 : शेजारी राष्ट्रांच्या दु:साहसाला सडेतोड उत्तर देणार- राष्ट्रपती 🛑

0
31

🛑 Independence Day 2020 : शेजारी राष्ट्रांच्या दु:साहसाला सडेतोड उत्तर देणार- राष्ट्रपती 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 15 ऑगस्ट : ⭕ देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शुक्रवारी म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्राला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील कोरोना महामारीचं संकट आणि शेजारी राष्ट्रांकडून होणारं दु:साहस यावर वक्तव्य केलं. शिवाय अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा मुद्दा अधोरेखित करत राष्ट्रपतींनी प्रगतीपथावर असणाऱ्या देशाचा आढावा घेतला. राष्ट्रपतींच्या याच संबोधनपर भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे ….

1) स्वतंत्र भारताच्या पायावरच आधुनिक भारत साकारला जात आहे. महात्मा गांधी आपले मार्गदर्शक असणं ही तर भाग्याची बाब.

2 ) समानता हा आपल्या लोकशाहीचा मूळमंत्र आहे. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीनं साऱ्या विश्वाला पोहोचवलेली हानी पाहता देशात स्वातंत्र दिनी धामधूम नसेल.

3) कोरोना योद्ध्यांनी या परिस्थितीला मोठ्या धीरानं तोंड दिलं. दुर्दैवानं कोरोनाशी लढताना काहींना आपले प्राण गमवावे लागले. देश त्या सर्व परिचारीका, डॉक्टर, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा ऋणी राहील.

4) पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरुवात करुन सरकारनं करोडो नागरिकांना मदत केली. जनहितासाठी राष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलली गेली.

5) सामर्थ्य आणि विश्वासाच्या बळावर कोविड १९ विरोधातील लढाईमध्ये अन्य राष्ट्रांनाही आपण मदतीचा हात दिला. काही राष्ट्रांना औषधांचा पुरवठा करत आपण हे पुन्हा एकदा सिद्ध केलं की भारत संकटसमयी विश्वसमुदायासमवेत उभा आहे.

6) देशाच्या संरक्षणार्थ आपल्या शूर जवानांनी त्यांच्या प्राणांची आहूती दिली. सारा देश गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या या वीरांपुढं नतमस्तक आहे. त्यांचा ऋणी आहे.

7) देशाचा विश्वास हा शांततेत आहे. पण, कोणीही देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सडेतोड उत्तर देण्यात येईल. आम्हाला आमच्या सशस्त्र संरक्षण दलांचा अभिमान आहे.

8) २०२० या वर्षानं महत्त्वाची शिकवण दिली. निसर्ग मानवाच्या अधीन आहे हा समज मोडकळीस निघाला. २१ व्या शतकाकडे असा काळ म्हणून पाहिलं गेलं पाहिजे जेव्हा मानवानं मतभेद दूर करत धरणीमातेच्या संरक्षणार्थ एकजुटीनं प्रयत्न केले.

आरोग्य क्षेत्रापासून देशातील महत्त्वाच्या घडामोडी आणि सद्यस्थितीचा आढावा घेत राष्ट्रपतींनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच देशातील तरुण पिढीचं भवितव्य उज्ज्वल आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ⭕

Previous article🛑 १५ आँगस्ट पासून ठाण्यातील सर्व दुकाने…! खुली करण्यास परवानगी 🛑
Next article🛑 केंद्राकडून पोलिस पदके जाहीर; महाराष्ट्रातील 58 पोलिसांचा गौरव 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here