🛑 हॉटेल मॅनेजमेंट जेईईची तारीख जाहीर 🛑

0
45

🛑 हॉटेल मॅनेजमेंट जेईईची तारीख जाहीर 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 14 ऑगस्ट : ⭕ नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे. NCHMCT JEE 2020 परीक्षा २९ ऑगस्ट २०२० रोजी होणार आहे. २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी जॉइंट एन्ट्रन्स परीक्षा हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी घेण्यात येते. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश या कॉम्प्युटर बेस्ड परीक्षेद्वारे होतात.

एनटीएने या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, ‘नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी जाईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन २९ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या कालावधीत आयोजित केली जाईल. विद्यार्थी आणि पालकांना असे आवाहन करण्यात येत आहे की परीक्षेसंदर्भातील सर्व अद्ययावत माहितीसाठी nta.ac.in आणि nchmejee.nta.nic.in या संकेतस्थळांना भेट देत राहा.’

विद्यार्थ्यांना NCHMCT JEE परीक्षा सुरू होण्याआधी १५ दिवस अगोदर आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. अॅडमिट कार्ड nta.ac.in आणि nchmejee.nta.nic.in या संकेतस्थळांवरून डाऊनलोड करता येतील. या परीक्षेचा निकाल एनटीए सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी करेल. देशभरातील विविध ७१ संस्थांमध्ये या प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.

ही ऑनलाइन परीक्षा आहे. ती तीन तास कालावधीची असेल. २०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. यात न्युमरिकल अॅबिलिटी, अॅनालिटिकल अॅप्टिट्यूट, रिझनिग अँड लॉजिकल डिडक्शन, जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, अॅप्टिट्यूड फॉर सर्व्हिस सेक्टर आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नांचा समावेश असतो. ⭕

Previous article🛑 टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भरती 🛑
Next article🛑 अभिनंदन गोविंदा पथक, दहीहंडी समन्वय समिती (महाराष्ट्र) तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here