🛑 एसटीच्या” स्मार्ट कार्ड ” योजनेला 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ..! 🛑

0
92

🛑 एसटीच्या” स्मार्ट कार्ड ” योजनेला 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ..! 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 14 ऑगस्ट : ⭕ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला 15 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता या योजनेला 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचेअध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते.या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठीसंबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ” स्मार्ट कार्ड “काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्येज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मात्र, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने सदर योजनेला 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंत्री,परब यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.⭕

Previous article🛑 खासदार नवनीत राणा यांना श्वास घ्यायला होतोय त्रास….! उपचारासाठी मुंबईत दाखल 🛑
Next article🛑 **मॅनेजर द्यायचा त्रास म्हणून दीड लाखांची सुपारी देऊन तोडले पाय** 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here