🛑 कोकणात गणपती स्पेशल ट्रेन चालवायला रेल्वे तयार…….! राज्य सरकारच्या होकारची प्रतीक्षा 🛑

0
29

🛑 कोकणात गणपती स्पेशल ट्रेन चालवायला रेल्वे तयार…….! राज्य सरकारच्या होकारची प्रतीक्षा 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ कोरोना व्हायरसमुळे गेल्या ५ महिन्यांपासून देशभरातली रेल्वे सेवा बंद आहे. पण आता रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी कोकणात स्पेशल ट्रेन चालवण्याची तयारी दर्शवली आहे.

याबाबत रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला विचारणा केली आहे. राज्य सरकारने होकार कळवल्यानंतर कोकणात गणपतीसाठी विशेष रेल्वे चालण्यात येतील, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकण विभागात (फक्त महाराष्ट्रात) स्पेशल ट्रेन चालण्याबाबत राज्य सरकारची भूमिका काय आहे? तसंच या काळात किती आणि कोणत्या तारखांना ट्रेन चालवण्यात याव्यात? याबाबत रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला विचारणा केली आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून रेल्वे कोकणात स्पेशल ट्रेन चालवायला तयार आहे…

पण याबाबत राज्य सरकार विचार करत असल्यामुळे सध्या या ट्रेनचं वेळापत्रक थांबवून ठेवण्याचं महाराष्ट्र सरकारमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनवरुन सांगितल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे.

याबाबतचा निर्णय झाल्यानंतर रेल्वेला कळवण्यात येईल, असंही राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा रेल्वेने केला आहे.

मध्य रेल्वे कोकणात गणपतीसाठी स्पेशल ट्रेन सोडायला तयार आहे, फक्त आम्हाला राज्य सरकारच्या होकाराची प्रतिक्षा आहे, असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे….⭕

Previous articleराज्यात १० पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर –
Next article🛑 फक्त एकाच निर्णयाने…! चीनला ५०० कोटींचा फटका – दिल्लीच्या व्यापाऱ्यांची करामत 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here