🛑 मराठा आरक्षणाबाबत १९ आॅगस्टला पुण्यात गोलमेज परिषद 🛑

0
24

 

🛑 मराठा आरक्षणाबाबत १९ आॅगस्टला पुण्यात गोलमेज परिषद 🛑
✍️ कोल्हापूर:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

कोल्हापूर -⭕मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांबाबत १९ ऑगस्टला पुण्यात गोलमेज परिषद आयोजित केली आहे. परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनांना निमंत्रित केले जाणार आहे. अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील व मराठा आरक्षण समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

महाराष्ट्रात ५८ मूक मोर्चे काढले. राज्यशासनाबरोबर अनेक वेळा बैठका केल्या. त्या माध्यमातून मराठा समाजाचे काही प्रश्न सोडवण्यात यश आले. परंतु काही मागण्या सोडवण्यासाठी कृती आराखडा तयार करणे आवश्‍यक आहे. यासाठीच पुण्यात राज्यातील सर्व मराठा समाजातील संघटनांना एकत्र करून गोलमेज परिषद आयोजित केलेली आहे.

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारची भूमिका व संघर्ष समितीची जबाबदारी धोरण निश्‍चिती.

सारथी संस्थेसाठी ५०० कोटीची आर्थिक तरतूद, आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासनाकडून नोकरी,राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये मराठा विध्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शिवस्मारकाचे काम तातडीने चालू करणे, कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा आणि राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगच्या शिफारसी लागू करण्याच्या मागण्यांसाठी या परिषदेत चर्चा होणार आहे…⭕

Previous article१५ आॅगस्टला सातारा जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू 🛑
Next article🛑 या गावात मिळते मोफत पाणी आणि मोफत दळण….! स्मार्ट सरपंचाचे गाव…. या गावची यशोगाथा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here