🛑 पुण्यात पोलिसांनवरच अॅन्टी करप्शन ब्युरोची धाड….! तपासत समोर आलं धक्कादायक सत्य 🛑

0
29

🛑 पुण्यात पोलिसांनवरच अॅन्टी करप्शन ब्युरोची धाड….! तपासत समोर आलं धक्कादायक सत्य 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे /नारायणगाव : ⭕पुण्यात पोलिसांवरच कारवाई झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि अर्जुन घोडे पाटील आणि पोलिस नाईक हांडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुणे अॅन्टी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली आहे. पोलिसांवरच कारवाई केल्याच्या बातमीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्ह्यतील नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील आणि पोलीस नाईक धर्मात्मा हांडे यांच्यावर पुणे अॅन्टी करप्शन ब्युरोची कारवाई करण्यात आली आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाखाची मागणी केल्याने पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक सुनिल बिले, पोलीस हवालदार टिळेकर, पोलीस शिपाई थरकार, पोलीस शिपाई महाशब्दे यांच्या पथकाकडून कारवाई केली आहे.

नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु असुन सपोनि घोडे पाटील यांच्या घराचीही तपासणी करण्याची कारवाई सुरु असल्याची माहिती पुणे अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिली. या प्रकरणात संशयीत सर्व पोलिसांची चौकशी केली जाणार असून घराची झडती घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यात तसं पाहायला गेलं तर गुन्ह्यांचं प्रमाण मोठं आहे. रोज पुण्यात धक्कादायक गुन्ह्यांच्या घटना घडतच आहेत. अशात पोलीसच जर तक्रारीसाठी पैशांची मागणी करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कुठे जायचं असा प्रश्न आहे….⭕

Previous article🛑 बिहार पोलिसांचा….! महाराष्ट्र पोलिसांवर उघडपणे हल्ला – उज्वल निकम 🛑
Next article🛑 हडपसर येथील मगरपट्टा येथे….! सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळीला अटक 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here