🔴 *ब्रेकिंग न्युज* 🔴 *सोशल मिडीया पोस्टमुळे बंगळुरात* *हींसाचार*

0
26

🔴 *ब्रेकिंग न्युज* 🔴
*सोशल मिडीया पोस्टमुळे बंगळुरात* *हींसाचार*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

सोशल मीडिया पोस्टमुळे कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये हिंसाचार उसळला. आमदारांच्या भाच्याने केलेल्या फेसबुक पोस्टनंतर हा हिंसाचार घडला. संतप्त जमावाने काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला केला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी फायरिंग केली असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका अॅडिश्नल कमिश्नरसह 60 लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह्य पोस्ट लिहिल्यामुळे काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याला अटक करण्यात आली आहे.
श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याने मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली.ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संध्याकाळीत साडेसात वाजण्याच्या सुमारास मुस्लिम समुदायातील शेकडो लोकांनी श्रीनिवास मूर्ती यांच्या घरासमोर गर्दी केली. संतप्त जमावाने मूर्ती यांच्या घारावर दगडफेक केली. एवढंचं नाहीतर तिथे असलेल्या 2-3 गाड्यांना आगही लावण्यात आली. त्यानंतर संतप्त जमावाने आपाल मोर्चा डीजे हल्ली पोलीस स्थानकाकडे वळवला आणि तिथे तोडफोड केली.
संतप्त जमावाची आक्रमकता आणि उफाळलेला हिंसाचार शांत करण्यासाठी पोलिसांना फायरिंग करावी लागली. या फायरिंगमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरूत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. याशिवाय डी. जे. हल्ली आणि के. जे. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे.

काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, ‘मी अखंड श्रीनिवास मूर्ती सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की, शांतता राखा. ज्याने ही चूक केली आहे, त्यासोबत चर्चा करून मी हे प्रकरण सोडवेल.’ सोशल मीडिया पोस्टवरून उफाळलेल्या या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील अमीर-ए-शरीयतने देखील शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज्याचे गृहमंत्री बासवराज बोम्मई यांनी सांगितलं की, हिंसेत सहभागी असणाऱ्या लोकांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई होईल.

Previous article*एका व्यापाऱ्याचं पत्नीवरील प्रेम* *प्यार के लिये साला कुछ भी करेगा*
Next article*यशवंत धर्मार्थ रूग्णालयाच्या वतीने शंभर बेडचे अद्यावत कोविड रूग्णालय सुरू.*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here