🛑 आयटीआय प्रवेशांसाठी मुदतवाढ 🛑

0
24

🛑 आयटीआय प्रवेशांसाठी मुदतवाढ 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 12 ऑगस्ट : ⭕ राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक आयटीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

राज्यातील खासगी आणि सरकारी आयटीआयमध्ये जागांसाठी प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली. अर्ज भरण्याची मुदत १४ ऑगस्टपर्यंत होती. या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली असून, सुधारित वेळापत्रक आयटीआयने जाहीर केले आहे. या प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना २६ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत हरकती नोंदविता येणार आहे.

प्रवेशाची पहिली फेरी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होईल. या यादीतील विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना १ ते ५ सप्टेंबर या कालावधीत संस्थानिहाय प्राधान्यक्रम सादर करावे लागतील. या फेरीची यादी ९ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता जाहीर होईल.

तिसऱ्या फेरीसाठी १० ते १५ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम सादर करावे लागतील. १८ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता निवडयादी संकेतस्थळावर जाहीर होईल. विद्यार्थ्यांना १९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे.

चौथ्या फेरीसाठी १९ ते २४ सप्टेंबरदरम्यान प्राधान्य भरता येतील. या प्रवेशाची यादी २८ सप्टेंबरला जाहीर होईल. विद्यार्थ्यांना २९ ते ३ ऑक्‍टोबर या कालावधीत प्रवेश निश्‍चित करावा लागेल. प्रवेश प्रक्रिया समाप्तीनंतर रिक्त राहणाऱ्या जागा भरण्यासाठी ५ ऑक्‍टोबरपासून जिल्हास्तरावर समुपदेशन फेरी राबविण्यात येईल.⭕

Previous article🛑 यंदा बाळगोपाळांसोबत अशी साजरी करा ‘गोकुळष्टमी’ 🛑
Next article🛑असा होणार गणेशोत्सव साजरा – विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम ! 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here