🛑 गणेशोत्सव काळात….! कोकणात अखंडित वीजपुरवठा करा….! ऊर्जामंत्री -डॉ. नितीन राऊत 🛑

0
34

🛑 गणेशोत्सव काळात….! कोकणात अखंडित वीजपुरवठा करा….! ऊर्जामंत्री -डॉ. नितीन राऊत 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात २४ तास अखंडित वीज पुरवठा करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज डॉ. राऊत यांनी कोकणातील विजेच्या कामाबाबत तसेच कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीला खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

कोकणात गणेशोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. या कालावधीत रायगडप्रमाणे रत्नागिरी येथेही वीज कपात न करता चोवीस तास वीज पुरवठा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश उर्जामंत्र्यांनी यावेळी दिले.

रोहा येथे २२ केव्ही स्वीचींग उपकेंद्र करण्यासंदर्भात २८०० चौरस मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येईल.

तसेच श्रीवर्धन तालुक्यात अतिउच्चदाब (ईएचव्ही) उपकेंद्र उभारल्यास दिघी बंदरासाठी ते फायदेशीर ठरू शकेल. रोहा तालुक्यामध्ये आरएसजे पोल्सची आवश्यकता आहे. तळा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सुरळीत वीज पुरवठ्यासाठी मोठ्या शाखा कार्यालयाची विभागणी दोन शाखांमध्ये करण्यासंदर्भातही कारवाई करण्यात यावी, अशी सूचना नितीन राऊत यांनी केली.⭕

Previous article🛑 आठ दिवसांत मागण्या मान्य करा….! अन्यथा मातोश्रीवर ठिय्या आंदोलन 🛑
Next article🛑 ब्रेकिंग न्यूज….! सोलापूर शहरातील पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी…! हे नियम लागू 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here