🛑 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा 🛑

0
24

🛑 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून पुणे जिल्ह्याअंतर्गत ४० मार्गांवर बससेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेला नुकतीच सुरुवात झाली आहे.

नेहमीच्याच दरात ही एसटीची सेवा सुरु करण्यात आली आहे. या प्रवासासाठी कुठल्याही ई-पासची आवश्यकता नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे…

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु केली असून, सध्या ५५ बसेस रस्त्यांवर धावत आहेत.

सरकारने फिजिकल डिस्टंसिंगच्या घालून दिलेल्या नियमांप्रमाणे, प्रत्येक बसमध्ये तिच्या क्षमतेपेक्षा निम्म्याच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. १० ते १२ एसटी गाड्या या वाकडेवाडी आणि स्वारगेट बस डेपोमधून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोडण्यात येत आहेत.

तर इतर बससेवा या तालुक्यांच्या मुख्यालयांना जोडणाऱ्या असणार आहेत. अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली आहे.

या मार्गावरील बससेवा सुरू
या एसटी गाड्या पुण्याहून बारामती, भोर, शिरुर, सासवड, नारायणगाव, राजगुरुनगर, इंदापूर, दौंड, पाटस, नीरा, जुन्नर, आळेफाटा, भीमाशंकर, वेल्हा, पौड, मुळशी या मार्गावर सुरू आहेत.

तसेच बारामती-भिगवण, बारामती-वालचंदनगर, बारामती-दौंड, स्वारगेट-वेल्हा, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, नारायणगाव-जुन्नर आणि जुन्न-देवळे या मार्गावर सुरु करण्यात आल्या आहेत….⭕

Previous article🛑 शाहरुख खानचे आँफिस झाले…! ICU गंभीर होणार उपचार….! 🛑
Next articleआळस नडला आणि आणि आठ लाख रुपये गमावले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here