🛑 शाहरुख खानचे आँफिस झाले…! ICU गंभीर होणार उपचार….! 🛑

0
32

🛑 शाहरुख खानचे आँफिस झाले…! ICU गंभीर होणार उपचार….! 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने जवळपास 3 महिन्यांपूर्वीच आपले ऑफिस BMCला दिले आहे. लक्षणे नसलेल्या रूग्णांसाठी क्वॉरांटाईन सेंटर करण्यात आले आहे. शाहरुख खानचे ऑफिस आता गंभीर रुग्णांसाठी ICUमध्ये रुपांतरित करण्यात आले आहे. शाहरुखने एप्रिलमध्ये आपल्या ऑफिसची चार मजली इमारत बीएमसीला दिली.

कोरोना साथीचा रोग जसजसा पसरला तसतसे शाहरुख खान अनेक राज्य सरकारांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. त्याने खारमधील आपली 4 मजली कार्यालय बीएमसीला क्वॉरांटाईन सेंटर तयार करण्यासाठी दिली आहे.

शनिवारी त्याचे 15 बेडच्या आयसीयूमध्ये रूपांतर करण्यात आले. हे काम शाहरुखच्या मीर फाउंडेशन आणि हिंदुजा हॉस्पिटलने संयुक्तपणे केले आहे…

शाहरुखने एप्रिलमध्ये आपल्या कार्यालयाची इमारत दिली पण डॉक्टरांची कमतरता असल्याने बीएमसीने मे पर्यंत ते घेतले नाही.

15 जुलैपासून याला ICUमध्ये बदलण्यात आले आणि आयसोलेट करण्यात आलेल्या रुग्णांना दुसर्‍या सेंटरमध्ये हलविण्यात आले. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत या क्वॉरांटाईन सेंटरमध्ये 66 लोकांना ठेवण्यात आले होते ज्यापैकी 54 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 12 लोकांना दुसऱ्या सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे कारण यांचे रुपांतर आता ICU मध्ये करण्यात आले….⭕

Previous article🛑 १२ आॅगस्टला लाँकडाऊनच्या विरोधात….! “वंचित” आघाडी कडून डफली बजाव आंदोलन…! 🛑
Next article🛑 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here