आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे : पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान, शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये असे सांगितले आहे, की महाराष्ट्रातील अनेक छोटे पक्ष हे मोठ्या पक्षांमध्ये विलीन होणार आहेत. आमची विचारधारा ही अनेक पक्षांबरोबर जुळून येत असून ती विचार झालेला प्रसंग अवधान धरून ते पक्ष लवकरात लवकर काँग्रेसमध्ये विलीन होतील असे भाकित शरद पवार यांनी केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक पक्ष विलीन होतील असे त्यांनी सांगितले आहे. भाजप अनेक पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे असे त्या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हे पक्ष लवकरात लवकर आमच्या विचारधारेला करून आमच्याबरोबर येथील असे त्यांनी सांगितले.परंतु कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर आम्ही आमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करू नंतरच निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले आहे. आम्ही सर्व धर्मांना सामावून घेऊन सर्व जातीना एकत्र करून विकासाची ही रणधुमाळी पुढे घेऊन जात आहोत त्यामुळे आमचे विचार अनेक पक्षांना आवडलेले आहेत. असेच विधान मागील काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही देखील केले होते,की प्रादेशिक दोन पक्ष हे लवकरात लवकर संपण्याच्या मार्गावर आहेत ते देखील काँग्रेसमध्ये विलीन होतील त्यामुळे शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोघांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खूप मोठी चर्चा ला उधानआले आहे हे दिसून येत आहे.






