Home Breaking News *शासकीय सेवेततील डाँक्टरांना खासगी रुग्णालयात उपचार करता* *येणार नाहीत,* *राज्यमंत्री राजेंद्र पाटील...

*शासकीय सेवेततील डाँक्टरांना खासगी रुग्णालयात उपचार करता* *येणार नाहीत,* *राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर)*

114
0

*शासकीय सेवेततील डाँक्टरांना खासगी रुग्णालयात उपचार करता* *येणार नाहीत,*
*राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर)*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

जिल्हा शासकीय रूग्णालयात जे वैद्यकिय सेवेत असलेले काही डॉक्टर खासगी रुग्णालयात सेवा देत आहेत. त्याची चौकशी करुन तात्काळ संबंधित डाँक्टरांच्यावर कारवाई करा, असे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी दिले.
तसेच कोरोना उपचारासाठीच्या खासगी रुग्णालयात बिले तपासणीसाठी ऑडीटरांची नियुक्ती करा. तपासणी केल्याशिवाय बिले घेतली जाऊ नयेत.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले,
जिल्हा शासकीय रुग्णालयात जे वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत त्यांना शासन भरमसाठ पगार देते.
त्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करता येणार नाहीत. यावर आरोग्य अधिकार्‍यांनी लक्ष ठेवून असे कोणी जिल्ह्यात कामकरत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा असे आदेश त्यांनी दिले आहेत.

Previous article🛑 भारतीय मराठा संघ तर्फे सांताक्रुझ मुंबई येथे चर्चासत्राचे आयोजन 🛑
Next article*उत्तर प्रदेशातील योगी सरकार* *बरखास्त करा ,* *काँग्रेस चे माजी.मंत्री नसिम खान*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here