Home Breaking News 🛑 सेनेचा हल्लाबोल, भाजपचं दूध आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा 🛑

🛑 सेनेचा हल्लाबोल, भाजपचं दूध आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा 🛑

68
0

🛑 सेनेचा हल्लाबोल, भाजपचं दूध आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा 🛑

✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

औरंगाबाद, 02 ऑगस्ट : ⭕ दूध खरेदी दराच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षानं आज केलेल्या आंदोलनाची माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी खिल्ली उडवली आहे. ‘भाजपचे हे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांचं आंदोलन भरकटलेलं आहे,’ असं खोतकर यांनी म्हटलं आहे.

दूध दराच्या मुद्द्यावरून भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना हे भाजपचे मित्रपक्षही आंदोलनात उतरले आहेत. राज्यात ठिकठिकाणी निषेध प्रदर्शन करून नेत्यांच्या प्रतिमांना दुग्धाभिषेक केला जात आहे. रास्ता रोको केला जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खोतकर यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली.

‘भारतीय जनता पक्षाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भाजपच्या केंद्रातील सरकारनं आधी परदेशातून दूध भुकटी आयात करणं थांबवावं. तसं केलं तर त्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलण्याचा अधिकार राहील, असं खोतकर म्हणाले.

‘मी दुग्धविकास खात्याचा मंत्री असताना दुधाचे भाव वाढविण्यासाठी प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही हा प्रश्न व त्यातील समस्यांची पूर्ण माहिती आहे. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे ही त्यांची सुरुवातीपासूनच भूमिका आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते १०० टक्के प्रयत्न करत आहेत,’ असं ते म्हणाले. ‘एकीकडं आंदोलनं करायची आणि दुसरीकडं दूध भुकटी आयात करायची, हा दुटप्पीपणा आहे. त्यामुळं भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आधी केंद्र सरकारला दूध भुकटीची आयात थांबवण्याची विनंती करावी. गरज पडल्यास त्यासाठी आंदोलन करावे, असा सल्लाही खोतकर यांनी दिला आहे.⭕

Previous article🛑 ५ कामगार ठार, नागपूरजवळच्या बेला येथील साखर कारखान्यात स्फोट 🛑
Next articleनांदेड जिल्ह्यात आज पुन्हा १४७ बाधितांची भर तर ४८ रूग्ण बरे व दोघांचा मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here